राजश्री शाहू शेतकरी विकास आघाडीने खोलले खाते
सत्ताधारी गटाचा एक उमेदवार बिनविरोध
तेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
श्री मंगराया विकास सेवा सोसायटी तेरवाड या निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून माघारीच्या आदल्या दिवशी सत्ताधारी गटाचा अनुसूचित जाती जमाती या गटातून राजेंद्र कांबळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. आज अर्ज माघारीचा अखेरचा दिवस आहे.
आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या मार्गदर्शनाखाली व शाबगोंडा पाटील यांच्या नेतृत्वाखाली राजश्री शाहू शेतकरी विकास आघाडीची स्थापना करण्यात आली आहे. माघारीच्या आदल्या दिवशी सत्ताधारी गटाचा अनुसूचित जाती जमाती या गटातून राजेंद्र कांबळे यांची बिनविरोध निवड झाली होवून सत्ताधारी गटाने आपले खाते खोलले आहे. आज अर्ज माघारीचा अखेरचा दिवस आहे. त्यामुळे लागणार किती होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे आणखी किती जागा बिनविरोध होणार ? याकडे सर्व सभासदांचे लक्ष लागून राहिले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा