अमरसिंह कांबळे युथ फौंडेशनचे कार्य कौतुकास्पद : गणपतराव पाटील

 


शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

अनुष्का कांबळे हिच्या  वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य, फळे वाटप व वृक्षारोपण असा उपक्रम राबवून अमरसिंह कांबळे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे, वृक्ष संवर्धन संकल्पने बरोबरच

 समाजातील होतकरू  व गरीब विद्यार्थी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून आदर्शवत काम  अमरसिंह कांबळे युथ फाऊंडेशन ने केले असून हे कार्य प्रेरणादायी आहे असे मत श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी व्यक्त केले.

   येथील कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अमरसिंह कांबळे  युथ फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष अमरसिंह कांबळे  यांची कन्या  कुमारी अनुष्का कांबळे  हिच्या  वाढदिवसानिमित्त येथील जे के मुळीक विद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप ,वृक्षारोपण व रुग्णांना फळे वाटपाचा कार्यक्रम दत्त चे चेअरमन गणपतराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री दत्त साखर कारखान्याचे संचालक महेंद्र  बागी होते. प्रारंभी शिक्षण संस्थेचे प्रमुख जे के मुळीक यांनी  स्वागत केले. यावेळी जेष्ठ नागरिक संघटनेचे उपाध्यक्ष सतीश आडगुळे यांनी प्रास्ताविक केले.   

    यावेळी स्कूल बस चालक आदगोंडा पाटील व रमेश हिंगमिरे यांचाही शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना रोख रक्कमेचे पारितोषिक देण्यात आले.   या कार्यक्रमास निवृत्त नायब तहसीलदार अशोक कांबळे, अमरसिंह कांबळे, बाळासाहेब माळी ,ऋषिकेश पाटोळे, यशवंत माने ,प्रशांत माने, राहुल जाधव, शंकर भाट  प्रदीप पाटील ,अमोल मोहिते यांच्यासह   शिक्षक , विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष