ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून चालक ठार ; कुरुंदवाड - मजरेवाडी रोडवरील घटना

 


कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

    येथील कुरुंदवाड दरम्यानच्या मजरेवाडी रस्त्यावर उस वाहतुकीच्या ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून चालक ठार झाला आहे.सचिन भीमराय चव्हाण (वय 29, रा.जलगिरी जि. विजापूर)असे मृत ट्रॅक्टर चालकाचं नाव आहे.

      दरम्यान रस्त्यावर बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.घटनास्थळी सपोनि बालाजी भांगे यांनी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवत ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त करून जमाव पागवला.

     सचिन चव्हाण हा आपल्या ताब्यातील ट्रॅक्टर व ट्रॉली क्र(एम एच 10,ए. वाय 4573) घेऊन ऊस भरण्यासाठी कुरुंदवाडकडे जात असताना मजरेवाडी रस्त्यावरील भबीरे मळ्या जवळ साडे अकरा वाजता सुमारास रस्त्यालगत खडी पडलेली आहे.या खडीवरून ट्रॅक्टर जम्प झाला.ट्रॅक्टरवरील चालक सचिनचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टर मधून त्याने उडी मारली असता ट्रॅक्टरच्या मोठ्या चाकाखाली पडल्याने चाक पोटावरुन गेल्याने तो जागीच ठार झाला.ट्रॅक्टर रस्त्यालगतच्या प्रवीण भबीरे यांच्या घरात शिरला.घराची भीत कोसळली असून सुदैवाने घरात कोणीच नव्हते पुढील अनर्थ टळला.

      हा ट्रॅक्टर कर्नाटक राज्यातील व्यक्तीच्या मालकीच्या असून त्यावर सचिन चव्हाण हा चालक म्हणून काम करत होता. येथील पोलीसात मृत्यूची नोंद झाली आहे.वर्दी सागर बापूसाहेब सूर्यवंशी यांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष