स्व.सत्यापाण्णा बरगाले शेतकरी विकास पॅनेलचा प्रचार शुभारंभ

मोठ्या शक्तीप्रदर्शनाने प्रचार रॅली


हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

सन १९४९ साली स्थापन करण्यात आलेल्या हेरवाड विकास सेवा सोसायटीची निवडणूक लागली असून सत्ताधारी गटाच्या माध्यमातून सत्यापाण्णा बरगाले शेतकरी विकास पॅनलचा प्रचार शुभारंभ मोठ्या शक्तीप्रदर्शनाने उत्साहात संपन्न झाला. 

यावेळी बोलताना पॅनेलचे सुकुमार पाटील म्हणाले, भारत स्वतंत्र झाल्यानंतर दोन वर्षात स्व. आलगोंडा पाटील, स्व. सत्यापाण्णा बरगाले, बाळगोंडा पाटील यांच्यासह ज्येष्ठ लोकांनी स्थापन केलेल्या या संस्थेचे आज मोठ्या वटवृक्षात रुपांतर झाले आहे. संस्थेने आजपर्यंत सभासदांचे हितच जोपासले आहे. मात्र, आज या संस्थेची निवडणूक लागली आहे. ही निवडणूक औपचारिकता असून संस्थेने सभासदांकरिता आजपर्यंत राबविलेले उपक्रम पाहता आमचे सर्वच उमेदवार भरगोस मतांनी निवडणून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यानंतर गावातील प्रमुख मार्गावरून प्रचार रॅली काढून शक्तीप्रदर्शन करण्यात आले.

यावेळी सरपंच सुरगोंडा पाटील, सदाशिव माळी, आप्पासो जोंधळे, पायगोंडा आलासे, रामगोंडा पाटील, भुपाल उगारे, अशोक पुजारी, देवगोंडा आलासे, कलगोंडा आलासे, अशोक नेर्ले, सागर ईटाज, अण्णा कोल्हापूरे, मिरासाहेब मुल्ला, अनिल उगारे, जमिर मुल्ला, बाबुराव माळी, हयाचांद जमादार, मल्लाप्पा आलासे, भोला शिंदे, बी.एस. गुरव, सुकूमार पाटील यांच्यासह संस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष