गुरु-शिष्याच्या मनोमीलनाचा विरोधकांना बसणार फटका ?
हेरवाड विकास सोसायटी निवडणूक रणधुमाळी
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
सन १९४९ साली स्थापन झालेल्या हेरवाड विकास सेवा सोसायटीची निवडणूक लागली असून सत्ताधारी गटाने स्व. सत्यापाण्णा बरगाले शेतकरी विकास पॅनेल तर विरोथी गटाने शेतकरी विकास परिवर्तन पॅनेलची निर्मिती करून निवडणूकीला सामोरे जात आहेत. सत्ताधारी गटातील असणारे गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये काही कारणात्सव दुरावा निर्माण झालेला होता, अखेर तालुक्यातील एका नेत्याने व हेरवाड येथील प्रमुख नागरीक यांच्या मध्यस्तीमुळे या गुरु आणि शिष्याचे मनोमीलन झाल्याचे समजते, त्यामुळे याचा थेट फटका आता विरोधी गटाला बसणार असल्याची चर्चा सभासद वर्गातून होत आहे.
सन १९४९ साली काही जेष्ठ मंडळींनी स्थापन केलेल्या हेरवाड विकास सेवा सोसायटीची निवडणूक लागली आहे. या निमित्ताने सत्ताधारी गटाने स्व. सत्यापाण्णा बरगाले शेतकरी विकास पॅनेल तर विरोथी गटाने शेतकरी विकास परिवर्तन पॅनेलची निर्मिती करून प्रचार करत आहेत. दोन्ही पॅनेलचा प्रचार शुभारंभ पाहता सत्ताधारी गटाने आपली ताकद दाखवून दिली असून 'निवडणूक ही एक औपचारिकता आहे, विजय तर आमचा निश्चित आहे' असा विश्वास सत्ताधारी गटाने व्यक्त केला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा