स्वाती सासणेंच्या माध्यमातून मतदारसंघाचा कायापालट

 माजी आमदार उल्हास पाटील ; संभाजीपूर येथे उद्घाटन शुभारंभ 



जयसिंगपुर / शिवार न्यूज नेटवर्क :

   जिल्हा परिषदेच्या माध्यमातून माजी समाजकल्याण सभापती स्वाती सासणे यांनी विविध विकासकामे आणली आहेत. कामाचा पाठपुरावा करून उदगाव मतदारसंघाचा कायापालट केला आहे. कामाच्या माध्यमातून प्रत्येक गावाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांना मिळालेल्या संधीचे सोने केले असल्याचे प्रतिपादन माजी आमदार उल्हास पाटील यांनी केले. ते संभाजीपुर (ता. शिरोळ) येथील विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

    संभाजीपुर (ता. शिरोळ) येथील २२ लाख रुपयाच्या विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा पार पडला. माजी सभापती स्वाती सासणे यांच्या निधीतून ही विकास कामे पूर्ण होत आहेत. येथील जवाहर गुमास्ता सोसायटी, पदमावती कॉलनी, वरेकर सोसायटी, विद्यानगर, ग्रामपंचायत कार्यालय येथील रस्ते, गटर्स, स्ट्रीट लाईट व सुशोभीकरणाच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक पराग पाटील,शैलेश आडके

उपसरपंच दिनकर कांबळे,शहरप्रमुख तेजस कुराडे, महिला आघाडी प्रमुख अर्चना भोजने, ग्रा.प.सदस्य विशाल पवार, ऋतुराज सावंत-देसाई, अश्विनी पाटील, माजी सरपंच अनंत माने, सचिन हजारे,बारविर पाटील,आनंदराव खाडे,देवदत्त चौगुले, सचिन खुडे, अजित अकिवाटे, अन्नपूर्णा पाटील,रंजना चौगुले,स्वप्नील परीट,ग्रामविकास अधिकारी प्रकाश कोळेकर यांच्यासह आजी माजी ग्रा. प. सदस्य व कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष