जैनापुर सेवा सोसायटी निवडणुकीत यड्रावकर गटाचे वर्चस्व
राजर्षी शाहू विकास आघाडीने जिंकल्या १३ पैकी १२ जागा
जैनापूर / शिवार न्यूज नेटवर्क :
येथील जैनापूर विविध कार्यकारी विकास सोसायटीच्या चुरशीने झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर समर्थक राजर्षी शाहू विकास आघाडीने १३ पैकी १२ जागा जिंकून सत्ता मिळवली,
नवनिर्वाचित संचालकांनी शनिवारी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर तसेच जयसिंगपूर चे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांची भेट घेतली यावेळी नवनिर्वाचित संचालकांचा राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर उपनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी तर महिला संचालकांचा सत्कार सौ नितु संजय पाटील यड्रावकर यांनी केला, यावेळी राजकुमार पाटील, विजय कुमार पाटील, सन्मती पाटील, विक्रम पाटील, रावसाहेब कांबळे, अमोल कांबळे, सचिन चौगुले, योगीराज कोळी आदी मान्यवर उपस्थित होते,नवनिर्वाचित संचालक मंडळ असे
राजगोंडा पाटील प्रवीण पाटील प्रशांत पाटील संदीप पाटील तेजपाल पाटील सिध्दगोंडा पाटील प्रकाश पाटील सौ कांचन पाटील सौ उज्वला मगदूम आनंदा कोळी राजेंद्र कांबळे सौ सुधा कोठावळे या सर्व नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार करण्यात आला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा