शेतकरी परिवर्तन पॅनलचा प्रचार जोरात

 हेरवाड विकास सोसायटी निवडणूक रणधुमाळी



हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या हेरवाड विविध कार्यकारी सेवा सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक लागली असून विरोधी गटाने शेतकरी परिवर्तन पॅनेलची निर्मिती करून सभासदांच्या घरा-घरापर्यंत पोहोचून आपल्या प्रचाराला मोठी गती दिली आहे. त्यामुळे या संस्थेत शेतकरी परिवर्तन पॅनेलचे सर्व उमेदवार निवडून येतील असा विश्वास मा. तंटामुक्त अध्यक्ष गिरीश पाटील, संतुबाई दुध संस्थेचे मा. संचालक आपगोंडा शिवगोंडा पाटील यांनी व्यक्त केला आहे.

8 मार्च या माघारीच्या दिवसानंतर विरोधी गटाने शेतकरी परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून विमान हे चिन्ह घेऊन अगदी सभासदांच्या घरापर्यंत जाऊन प्रचाराला सुरुवात केली. सभासद वर्गातूनही या पॅनेलच्या प्रचाराला मोठा प्रतिसाद मिळत आहे. 

दरम्यान याबाबत बोलताना गिरीश पाटील म्हणाले, सभासदांचे हित जोपासण्यासाठी आम्ही विरोधी पॅनलची निर्मिती केली आहे. प्रत्येक सभासदाला संस्थेमार्फत विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. याचबरोबर कर्जांचे वाटप, जास्तीत- जास्त प्रमाणात डिव्हीडंट वाटप करून सभासदांचे हित जोपासले जाणार आहे. सध्या प्रचाराला मिळालेला सभासदांचा प्रतिसाद पाहता आमचे संपूर्ण पॅनेलमधील उमेदवार निवडून येतील, असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष