अर्जुनवाड मध्ये रोटेशन पद्धतीने पाणी सोडण्याची मागणी

 


राहूल डोंगरे / शिवार न्यूज नेटवर्क :

   अर्जुनवाड ता. शिरोळ येथे रोटेशन पद्धतीने पाणी सोडण्याचे नियोजन नसल्याने ठराविक भागापुरते नियमित आणि वेळेत पाणी सोडण्यात येते मात्र ठराविक भागात अ वेळी पाणी पुरवठा केला जातो ग्रामपंचायत ने ठराविक दिवसांनी क्रम पाळी ठेवून सर्व भागात रोटेशन पद्धतीने पाणी पुरवठा करण्यात यावा.पाण्याच्या अनियमित सोडल्याने पाणी वाटपाची समस्या अधिकच तीव्र झाली आहे. ही परिस्थिती म्हणजे मळा भागातील ग्रामस्थांच्या साठी धोक्याची घंटा आहे.

अर्जुनवाड गावा मध्ये नियोजन आणि पाणी सोडण्याच्या पुरवठ्याचा प्रश्न नागरिकांना पाण्याची समस्या भेडसावत असल्याचे चित्र आहे. या प्रश्ना कडे गंभीर्याने लक्ष देउन अर्जुनवाड मधील सर्व ग्रामस्थांना समान न्याय देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष