शिरोळ चे माजी सरपंच गोरखनाथ माने समाज भूषण पुरस्काराने सन्मानित
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी येथील नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन व हेल्थ अँड नेचर डेव्हलपमेंट सोसायटी यांच्यातर्फे शिरोळ येथील माजी सरपंच गोरखनाथ बाबुराव माने यांना सामाजिक क्षेत्रातील विशेष कार्याबद्दल 'समाज भूषण ' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, चिकोडी येथे रविवारी महाराष्ट्र ,कर्नाटक व गोवा आंतरराज्य पुरस्कार वितरण समितीच्या वतीने हा कार्यक्रम झाला.
शिरोळचे माजी सरपंच माने यांनी राजकीय व सामाजिक क्षेत्रात गेली 40 वर्ष आदर्शवत काम केले आहे, शिरोळ गावचे उपसरपंच ते सरपंच या पदावर त्यांनी केलेले काम कौतुकास्पद असून सामान्य गोरगरीब निराधार व दुर्लक्षित घटकाना देण्यासाठी त्यांनी विशेष कार्य केले आहे या कामाची दखल घेवून बेळगाव जिल्हा आंतरराज्य पुरस्कार समितीने श्री माने यांचा गौरव केला.
यावेळीमाजी केंद्रीय मंत्री श्रीमती रत्नमाला सावनूर, बेळगावचे माजी खासदार अमरसिंह पाटील, दत्त साखर कारखान्याचे संचालक व भाजपा नेते अनिलराव यादव यांच्या हस्ते कोल्हापुरी फेटा ,सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन आंतरराज्य सामाज भूषण पुरस्काराने गोरखनाथ माने यांना सन्मानित करण्यात आले. माजी केंद्रीय मंत्री श्रीमती सावनूर व खासदार पाटील यांनी पुरस्कार प्राप्त व्यक्तींच्या कर्तुत्वाचा गौरव करून कार्यक्रम आयोजकाना शुभेच्छा दिल्या.
यावेळी गृहरक्षक दल जिल्हा कमांडंट अरविंद घट्टी, जवाहर कारखान्याचे राहुल आवाडे, बाळासाहेब माळी ,डी आर पाटील, दिलीप राजमाने, दिलीप पांडव, संदीप माने, अवधूत माने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा