हेरवाड विकास सोसायटी निवडणूकीत सत्ताधार्‍यांनी राखला गड


हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

हेरवाड विकास सेवा सोसायटीच्या निवडणुकीत सत्ताधारी गटाचे १३ पैकी १३ उमेदवार निवडून आल्याने अखेर सत्ताधार्‍यानी आपला गड राखला आहे. विरोधी शेतकरी विकास परिवर्तन पॅनलचा धुव्वा उडाला आहे. सर्वच उमेदवार निवडून आल्याने हेरवाड विकास संस्थेवर सत्ताधाऱ्यांचे वर्चस्व राहिले आहे. 

रविवारी सकाळी आठ वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. सकाळी ११ वाजेपर्यंत २१३ एवढे चुरशीने मतदान झाले होते. तर सायंकाळी चार अखेर ३१५ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यानंतर लगेचच मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. या अगोदर सत्ताधारी गटाचा एक उमेदवार बिनविरोध निवडणूक आला होता. मतमोजणी नंतर सत्ताधारी गटाचे १२ पैकी १२ उमेदवार निवडून आले. या निवडीनंतर सत्ताधारी गटातील उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी गुलाबाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करीत आनंदोत्सव साजरा केला. यानंतर गावातील प्रमुख मार्गावरून सत्ताधारी गटाने आपल्या निवडून आलेल्या उमेदवारांची रॅली काढली. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी कुरुंदवाड पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अमित पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलिस फौजफाटा हेरवाड येथे दाखल होता.

निवडून आलेले सत्ताधारी गटाचे उमेदवार खालीलप्रमाणे - सर्वसाधारण खातेदार मतदार संघात - बाबुराव आलासे (२१३), शंकर आलासे (२१४), दत्तात्रय पाटील (१८८), भास्कर कुंभार (२१६) निंगोंडा पाटील (२१८), वैभव पाटील (२३५), आनंदा बरगाले (२३५), बाळासो माळी (१९६).

महिला - राजश्री पाटील (१८४), शांताबाई माळी (२०७), 

अनु.जाती / जमाती - मोहन थरकार (१९५).

भटक्या विमुक्त - दत्तात्रय बरगाले (बिनविरोध)

इतर मागासवर्गीय - अशगरअली मुल्ला (१९६)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष