कुरुंदवाड महावितरण कार्यालयावर यंत्रमाग व्यावसायिकांचा मोर्चा
कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
यंत्रमाग व्यावसायिकांची विजबिले जुन्या दराने वसूल करावीत तर शेतकऱ्यांच्या वीज बिलाची दुरुस्ती करून योग्य बिले वसूल करावी अन्यथा यंत्रमागाच्या धोटा आणि उसाचा कांडा हातात घेऊन रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा खणखणीत इशारा वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष पुंडलीकराव जाधव यांनी दिला आहे.
येथील यंत्रमाग व्यावसायिकांच्या वीज बिलाचे अनुदान शासनाने रद्द केल्याने बिलात भरमसाठ वाढ करण्याच्या निषेधार्थ महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता यावेळी वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष जाधव बोलत होते. प्रतापराव होगाडे, महाराष्ट्र राज्य विणकर संघटनेचे संचालक दीपक रासनकर, जिन्नप्पा पोवार, हाजी महंमद बागवान आदी मोर्चात उपस्थित होते.
यावेळी बोलताना होगाडे म्हणाले शेतकऱ्यांना त्यांच्या वापर झालेल्या विजय पेक्षाही जादा दराची बिले देऊन शेतकऱ्यांच्या मानगुटीवर आर्थिक सुरी फिरवण्याचा प्रयत्न महावितरणने चालवला आहे.तर यंत्रमाग व्यावसायिकांच्या बाबतीत राज्य सरकार आणि महावितरणने सांगड करून यंत्रमाग व्यावसायिकाला भिके-कंगाल करण्याचा घाट रचला आहे.हे आम्ही कदापि होऊ देणार नाही जुन्या दरानेच विज बिल भरणार असल्याचे सांगितले.
यावेळी रासनकर,अरुण म्हतापे, जोतिबा जाधव, जेम्स घोरपडे आदींनी भाषणे केली.यावेळी मोर्चात प्रकाश घोरपडे, नवनाथ घारे, जहीर मोमीन, जैनूल बागवान, अल्ताफ बागवान, निलेश जिवाजे, राजेंद्र देवकाते सुनिल पवार आयुब कुरणे आनंदा मोहिते अमित कारागीर नोर पठाण संभाजी चव्हाण, गजानन माळी, चेतन माळी, विनायक इंगळे,अक्रम गोलंदाज, गणपती मोहिते, सुनील मोगणे, राजेंद्र माळी, राजू जुगळे,दीपक सावंत, अमोल देवकाते आदी यंत्रमाग व्यावसायिक सहभागी झाले होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा