सत्ताधारी गटाला कपबशी तर विरोधी गटाला विमान

 मंगराया विकास सेवा सोसायटी निवडणूक रणधुमाळी



तेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

श्री मंगराया विकास सेवा सोसायटी तेरवाड या निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून १२ जागेसाठी २४ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून आज सहायक निबंधक कार्यालयात चिन्हांचे वाटप करण्यात आले, यावेळी सत्ताधारी गटाला कपबशी तर विरोधी गटाला विमान हे चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे उद्यापासून प्रचाराला गती येणार आहे. 

 सत्ताधारी गटाचा अनुसूचित जाती जमाती या गटातून राजेंद्र कांबळे यांची बिनविरोध निवड होवून सत्ताधारी गटाने आपले खाते खोलले आहे. एकूण १२ जागेसाठी २४ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आज २५ रोजी चिन्हांचे वाटप करण्यात असून सत्ताधारी गटाला कपबशी तर विरोधी गटाला विमान हे चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे उद्यापासून प्रचाराला मोठी गती येणार आहे. ४ एप्रिल रोजी मतदान होणार असून याच दिवशी मतमोजणी संपन्न होणार असल्याची माहिती सहाय्यक निबंधक कार्यालयाकडून देण्यात आली. 

ज्याच्याकडे कपबशी त्याचा विजय

ज्या उमेदवाराकडे कपबशी चिन्ह त्याचा विजय निश्चित असतो, हे केडीसी बँकेपासून सध्या होत असलेल्या सेवा सोसायट्यांच्या निवडणूकीत जनतेने दाखवून दिले आहे. सत्ताधारी राजश्री शाहू विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांनाही कपबशी चिन्ह मिळाल्याने या पॅनेलचाही विजय निश्चित होणार,  असा विश्वास सत्ताधारी गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष