शिरोळ पंचायत समितीवर 'प्रशासकराज'

 


शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

शिरोळ पंचायत समितीच्या सदस्यांची मुदत रविवारी (दि.१३) रोजी संपत असल्यामुळे सोमवारपासून पंचायत समितीमध्ये 'प्रशासकराज' सुरू झाले आहे.गटविकास अधिकारी हे पंचायत समितीचे प्रशासक असणार आहेत.त्यामुळे कारभार प्रशासकाच्या हाती जाणार आहे. यासंदर्भात ग्रामविकास विभागाच्या वतीने अधिसूचना जारी केली आहे.कोरोनामुळे अनेक निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.त्यानुसार पंचायत समितीच्या निवडणुकाही आता पुढे ढकलण्यात आल्या आहेत.शिरोळ पंचायत समितींची मुदत दि. १३ मार्च रोजी संपली आहे. त्यामुळे सोमवारपासून या पंचायत समितींवर गटविकास अधिकारी शंकर कवितके प्रशासक म्हणून काम पाहत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष