दानोळीत शॉक लागून युवकाचा मृत्यू
दानोळी / शिवार न्यूज नेटवर्क :
शेती पंपाच्या मोटर पेटीत करंट उतरल्याने शॉक बसून येथील विशाल पाटील-नांद्रे या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
येथील नांद्रे माळ्यातील विशाल चवगोंडा पाटील-नांद्रे (वय-20) हा युवक सकाळी साडे आठ वाजता शेतातील बोअर ची मोटर सुरु करण्यासाठी गेला होता. त्याने मोटर पेटीच्या हँडेलला हात लावला आणि तो तेथेच चिकटला. हि बाब लक्षात येताच शेजारील शेतकऱ्यांनी काठी च्या सहायाने त्याला बाजूला केले पण तोंडातून फेस येऊ लागला. दरम्यान रुग्णालयात त्याला मृत घोषित करण्यात आले. विद्युत निरीक्षक जयश्री पाटील यांनी पहाणी केली असता सर्व्हिस वायर मधून पेटीत करंट उतरल्याचे लक्ष्यात आले. दरम्यान जयसिंगपूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. एकुलता एक असलेल्या विशालच्या पाश्चात आई, वडील, दोन विवाहित बहिणी आहेत. जयसिंगपूर येथे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. जयसिंगपूर पोलीस कर्मचारी व पोलीस पाटील प्रशांत नेजकर उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा