जयसिंगपूर येथे ' साई-सेवन व्हेंचर्स ' या इलेक्ट्रिक बाईक शोरूमचे सोमवारी उद्घाटन

 


जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :

         येथे सोमवारी ' साई सेवन व्हेंचर्स ' या इलेक्ट्रिक बाईक शोरूमचा शुभारंभ सायंकाळी होत आहे. दत्त उद्योग सहकार समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांच्या हस्ते आणि ष.ब्र. परमपूज्य श्री. शिवसिद्ध सोमेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांचे सानिध्य आणि आशीर्वादाने शुभारंभ होणार आहे अशी माहिती साईनाथ उद्योग समूहाचे संस्थापक अशोकराव कोळेकर व साई-सेवन व्हेंचरचे संचालक लक्ष्मण भीमाशंकर कोळेकर यांनी दिली.

     या समारंभास राज्याचे आरोग्य, वस्त्रोद्योग राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार उल्हास पाटील, जि. प.चे, माजी बांधकाम समिती सभापती सावकर मादनाईक, परमपूज्य देबाजे मामा-हेरवाडकर, परमपूज्य करेसिध्येश्वर पुजारी (हारुगिरी,कर्नाटक), परमपूज्य नंदूअण्णा माणगावकर (शिरोळ), साई सेवन व्हेंचरचे मॅनेजिंग डायरेक्टर राजकुमार कोळेकर, साई सेवन व्हेंचरचे संचालक बाळासाहेब कर्णवर-पाटील, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

  अशोकराव कोळेकर यावेळी बोलताना म्हणाले, कमी खर्च, प्रदूषण मुक्त, कमी त्रासदायक, कमी देखभाल व कर बचत या इलेक्ट्रिक बाईकमुळे होणार आहे.13 व्या.गल्लीत कोळेकर बिल्डिंग, लक्ष्मीरोड येथे होणाऱ्या या शोरूमच्या उद्घाटनप्रसंगी शहर व परिसरातील नागरिकानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी अशोकराव कोळेकर यांनी केले.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष