श्री घोडगिरी बिरदेव मंदिरास देणग्यांचा ओघ सुरुचं
राहूल डोंगरे / शिवार न्यूज नेटवर्क :
महाराष्ट्र कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धा स्थान असणाऱ्या अर्जुनवाड येथील श्री घोडगिरी बिरदेव मंदिराच्या शिखर जीर्णोद्धार साठी भाविकांकडून मदतीचा ओघ सुरूच आहे.
अर्जुनवाड चे सुपुत्र श्री श्रीमंत चौगुले यांच्या कडून रोख 80000 देणगी देण्यात आली त्याच बरोबर पुणे महानगरपालिका - सहाय्यक आयुक्त पुणेश्री संभाजी खोत यांच्या कडून 51000 हजार रुपये तसेच उदगाव येथील जैन भक्त बांधवाकडून 33910रुपयेची देणगी स्वरूपात शिखर जीर्णोद्धार समिती अर्जुनवाड यांच्या कडे सुपूर्द करण्यात आले या वेळी विष्णू चौगुले, अनिल मेडसिंगे,उदगाव येथील भक्त मंडळी आदी सर्व मान्यवर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी समस्त धनगर बांधव ग्रामस्थ वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा