हेरवाड विकास सोसायटीसाठी ३१५ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

 लगेचच मतमोजणीला होणार सुरुवात



हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

हेरवाड विविध कार्यकारी सेवा सोसाटीसाठी ३३९ पैकी ३१५ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. या संस्थेसाठी सकाळपासूनच मोठ्या चुरशीने मतदान पार पडले. लगेचच मतमोजणीला सुरुवात होणार असून उमेदवारांनी आपले देव पाण्यात ठेवले आहेत. 

गेल्या चाळीस वर्षानंतर या संस्थेची निवडणूक लागली आणि . या संस्थेसाठी सत्ताधारी स्व. सत्यापाण्णा बरगाले शेतकरी विकास पॅनेलच्या माध्यमातून १२ उमेदवार रिंगणात उतरले आहेत तर विरोधी शेतकरी विकास पॅनेलच्या माध्यमातून ११ उमेदवार रिंगणात उतरले. सत्ताधारी आणि विरोधक गटाने सभासदांना आपल्या बाजूने वळविण्यासाठी अनेक प्रयत्न केल्याचे समजते. मात्र मतदारांचा कौल काय आहे, हे या तासाभरातच समजणार आहे. 

दुपारी ४ वाजेपर्यंत सुमारे ३१५ इतके मतदान झाले होते. त्यामुळे सभासदांनी ही निवडणूक मनावर घेतल्याचे दिसून येते. चार वाजून १५ मिनिटांनी मतमोजणीला सुरुवात करण्यात येणार आहे. मतमोजणी नंतरच गुलाल कुणाचा हे कळणार असल्याने मतमोजणी ठिकाणी सत्ताधारी आणि विरोधकांची गर्दी होताना दिसून येत आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष