जागतिक महिला दिनानिमित्त कै गोविंद बंडू आवळे सोशल फौडेशन तेरवाड यांच्या वतीने महिलांसाठी ई श्रम कार्ड शिबिराचे आयोजन


 तेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

तेरवाड गंगापूर भागातील असंघटित शेतात मजुरी करणार्‍या तसेच बांधकाम कामगार महीला व रोजंदारीवर काम करत असलेल्या महिला यांच्याकरीता आज कै गोविंद बंडू आवळे सोशल फौडेशन तेरवाड व मातंग समाज संघटना गंगापूर यांच्या सहकार्याने आज महिला दिनानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या व भेट म्हणून ई श्रम कार्ड काढून देण्यात आले, या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डी बी एस संघटनेच्या जयसिंगपूर शहर अध्यक्ष मा.सौ.साजीदा घोरी, तर अध्यक्ष म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख सौ मंगलताई चव्हाण व प्रमुख उपस्थिती मध्ये ग्रामपंचायत सदस्या श्रीमती शोभा गोविंद आवळे व सौ विमल चव्हाण उपस्थित होत्या ,स्वागत व प्रास्ताविक उमेश आवळे यांनी केले तर महीलांसाठी शैक्षणिक, सामाजिक व व्यवसायाची माहिती घोरी मँडम यांनी मनोगतातून व्यक्त केले तर, महिलांनी अन्याय सहन न करता धाडसाने कसे पुढे जावे एकमेकींना प्रेमाने व सहकार्याची वागणुक देऊन गोडी गुलाबीने कसे रहावे या बद्दल मार्गदर्शन मंगलताई चव्हाण यांनी दिले, इ श्रम कार्ड काय आहे आणि का काढावे याची माहिती भारत मल्टीसर्व्हीस च्या प्रोप्रारायटर सौ पुजा कांबळे यांनी दिली, उपस्थित सर्व महीला भगीणींचा सत्कार मान्यवरांचे हस्ते करण्यात आला व ओंकार हाँल चे मालक श्रीकांत हेगडे व वंदना हेगडे यांचा सत्कार करण्यात आला, शेवटी आभार गंगापूर मातंग समाज संघटनचे सचीव तुकाराम आवळे यांनी मानले व सर्व महीलांचे आँनलाईन पद्धतीने ई श्रम कार्ड काढून देण्यात आले जवळपास पन्नास महिलांना मोफत इ श्रम कार्ड फौडैशनच्या माध्यमातून काढून देण्यात आले, या कार्यक्रमासाठी सुखदेव हेगडे, नाना शेडबाले, राकेश सातपुते, तुकाराम आवळे, रितेश हेगडे, औकार हेगडे यांचे सहकार्य लाभले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष