गेट टूगेदरला फाटा देऊन मित्राच्या कुटुंबियांना 26 हजारांची मदत
राहूल डोंगरे / शिवार न्यूज नेटवर्क :
दानोळी येथील 2005 - 6 च्या बॅचच्या सर्व मित्र मैत्रिणींनी मिळून त्यांच्या बॅचचा मित्र कै हणमंत नाडे यांच्या कुटुंबाला 26 हजारांची मदत करून सामाजिक बांधिलकी जोपासली.
हणमंत नाडे हा 2005/6 चा 10 बॅचचा विद्यार्थी त्याचे काही वर्षपुर्वी अचानक निधन झाले.घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची पण त्याच्या मुलाची अचानक तब्बेत बिघडली आणि डॉक्टरांनी काही तासाची मुदत दिली याची धास्ती घेऊन हणमंत नाडे याची तब्बेत खालावली आणि त्यांचे निधन झाले.
निधनाच्या वेळी त्याच्या अंत्यसंस्कारचा खर्च मित्रांनीच केला पण सध्या हणमंत याची आई खूप आजारी आहे तिला स्वतःला हालचाल सुद्धा करता येत नाही त्यातच त्याचे वयस्कर वडील त्यामुळे हणमंतच्या मुलाच्या पुढील शैक्षणिक खर्चाला थोडी मदत व्हावी या हेतूने त्याच्या सर्व मित्रांनी व मैत्रिणींनी एकत्रित येऊन तब्बल आठ दिवसांत 26 हजारांची मदत या नाडे कुटुंबाला दिली ही मदत हणमंत नाडे याचा मुलगा अनिकेत नाडे याच्या नावे ठेव पावती करण्यात आली आहे. या मित्रांच्या मदतीने दानोळी सह परिसरात कौतुक होत आहे. यावेळी सर्व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा