महापुराचा धोका टाळण्यासाठी खिद्रापूर - जुगूळ पुलासाठी पिल्लर कमानी उभे करा
अँड सुशांत पाटील यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी
कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
खिद्रापूर-जुगूळ असा कर्नाटक राज्याला जोडला जाणारा कृष्णा नदीवर पुल उभारण्यात येत आहे. या पुलाच्या दोन्ही बाजूला भराव घालण्यात येत आहे. भरावामुळे भविष्यात महापुराची तीव्रता शिरोळ तालुक्याला जाणवणार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी भराव न घालता पिल्लर कमानी उभ्या कराव्यात अशा मागणीचे निवेदन अँड सुशांत संजय पाटील यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना दिले.
शिरोळ तालुक्याला प्रत्येक वर्षी महापुराच्या भयंकर संकटाला सामोरे जावे लागते. त्या संकटात शिरोळ तालुक्यातील जनतेचे न भरुन निघणारे नुकसान होते. त्यामुळे महापुराची कारणे शोधून महापूर काळात पाण्याला अडथळा ठरणारा भराव मोठ्या प्रमाणात टाकला जात आहे. शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर - जुगुळ हा होणारा पुल त्याचेच एक उदाहरण आहे. त्यामुळे खिद्रापूर-जुगूळ असा कर्नाटक राज्याला जोडला जाणारा कृष्णा नदीवर पुल उभारण्यात येत आहे. या पुलाच्या दोन्ही बाजूला भराव घालण्यात येत आहे.
भरावामुळे भविष्यात महापुराची तीव्रता शिरोळ तालुक्याला जाणवणार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी भराव न घालता पिल्लर कमानी उभ्या कराव्यात अशी मागणी अँड सुशांत पाटील यांनी केली आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा