शिरोळ मधील विठ्ठल भक्त पंढरपूरला पायी दिंडीने रवाना


 शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

 शिरोळ येथील वारकरी व भक्तगण मंगळवारी सकाळी शिरोळहून श्रीक्षेत्र पंढरपूर चैत्रवारीसाठी पायी दिंडीने रवाना झाले. समस्त शिरोळ ग्रामस्थ व संप्रदायाच्या वतीने या दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे, दरम्यान शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई , प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष दगडू माने यांच्यासह मान्यवरांनी श्रींच्या पालखीचे दर्शन घेऊन विठ्ठल भक्तांना पायी दिंडीसाठी शुभेच्छा दिल्या.

         येथील गुरुप्रसाद इंडस्ट्रीचे प्रमुख उद्योगपती दादासाहेब इंगळे, अनिल इंगळे, सुनील इंगळे व किरण माने यांनी गेल्या काही वर्षापासून चैत्र वारीच्या निमित्ताने वारकऱ्यांसाठी आणि विठ्ठल भक्तांकरिता शिरोळ ते पंढरपूर पायी दिंडीचे आयोजन केले आहे, कोरोना संसर्गाच्या महामारीमुळे गेली दोन वर्षे पायी दिंडी सोहळा झालेला नव्हता, मात्र यावर्षी पायी दिंडीमध्ये आबालवृद्धांसह मोठ्या प्रमाणात महिला आणि वारकरी सहभागी झाले आहेत.

       प्रतिवर्षाप्रमाणे उद्योगपती दादासाहेब इंगळे यांच्या निवासस्थानी पालखी व विणा पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले, त्यानंतर नदीवेस गावडे गल्ली येथील हनुमान मंदिरात दर्शन घेऊन दिंडीचे प्रस्थान झाले, यावेळी शिरोळ शहरातील श्री ब्रह्म मंदिर, श्री दत्त मंदिर , श्री हनुमान मंदिर, श्री राम मंदिर, श्री विठ्ठल मंदिर या ठिकाणी दर्शन घेत टाळ मृदुंगाच्या गजरात आणि विठ्ठलनामाच्या जयघोषात ही पायी दिंडी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली. दिंडीच्या मार्गावर सडा मारून रांगोळी घालून विना व पालखीला पाणी घालून सर्वत्र दिंडीचे उत्साहात स्वागत करून बोला पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम चा जयघोष केला. यावेळी दिंडी पालखीचे दर्शन भाविकांनी घेतले, यामुळे या परिसरात भक्तिमय वातावरण झाले होते.

       यावेळी गुरुप्रसाद इंडस्ट्रीज चे प्रमुख दादासाहेब इंगळे ,अनिल इंगळे, सुनील इंगळे, महेश कळेकर ,विलास गावडे ,संग्राम माने, चंद्रकांत भाट, संदीप इंगळे ,दत्तात्रय जाधव, बाळासाहेब जगदाळे, बाळासाहेब गावडे, पुंडलिक कोळी, किरण माने, सर्जेराव माने, विलास गावडे शंकर गावडे ,भरत रोडे, सुनील पोळ ,राजेंद्र गंगधर, बबलू पाटील ,तानाजी माने ,संभाजी संकपाळ ,रघुनाथ कदम, चंद्रकांत गावडे,अमर जगदाळे यांच्यासह मान्यवर हजर होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष