कुरुंदवाड : तोतया पोलिस उपनिरीक्षक जेरबंद

      


   कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

कुरुंदवाड दरम्यानच्या शिरढोण रस्त्यावर पोलीस उपनिरीक्षक असल्याचे भासवून चार चाकीतून फिरत असताना कुरुंदवाड पोलिसांना मिळून आला.सागर भय्यासो भोसले (रा.  विश्रामबाग,ता.मिरज,जि. सांगली)असे त्याचे नाव आहे.येथील पोलिसात याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान गुरुवारी मध्यरात्री सुमारास सपोनि बालाजी भांगे गस्त घालत असताना संशयित आरोपी भोसले हा मिळून आला. कुरुंदवाड हद्दीतील शिरढोण रस्त्यावर संशयित आरोपी सागर भोसले हा पोलिस उपनिरीक्षकाची खाती वडजी परिधान करून खांद्यावर दोन्ही बाजुस प्रत्येकी दोन स्टार, लाल निळ्या रंगाची फित, पोलीस उपनिरीक्षक सागर भ भोसले अशी नेमप्लेट, रेड बेल्ट, रेड कलरचे बुट परिधान करुन मारुती कार चारचाकी मारुती कार(क्र.एमएच-10-डीजी 3487)मधून शिरढोणकडे जात असताना सपोनि बालाजी भांगे गस्त घालत असताना कार अडवून माहिती घेत असताना संशय आल्याने ताब्यात घेऊन तपास केला असता तो पोलिस वर्दी घालून तोट्यागिरी करत असल्याचे स्पष्ट झाल्याने त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून फिर्याद पोहेकॉ फारूक जमादार यांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष