कुटवाड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
राहूल डोंगरे / शिवार न्यूज नेटवर्क :
कुटवाड ता. शिरोळ येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त समता युवा बौद्ध संस्कार मंडळ यांच्यामार्फत सोमवार दि. ११ एप्रिलपासून १४ एप्रिलपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ११ एप्रिल रोजी मॅरेथॉन ५ कि.मी मोठा गट मुले, खुला गट १६०० मी. मुली आणि ५०० मी. लहान गट मुले, १२ एप्रिल रोजी समता चषक भव्य कब्बडी स्पर्धा, १३ एप्रिल रोजी पंचशील चषक वक्तृत्व स्पर्धा लहान गट पाहिली ते चौथी आणि मोठा गट पाचवी ते दहावी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच १४ एप्रिल रोजी विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विशेष सन्मान सोहळा आयोजित केला आहे. या कार्यक्रमासाठी हिंदू एकता आंदोलन मंडळ, शिवप्रतिष्ठान मंडळ, देशप्रेमी मंडळ,आझाद मंडळ,मंगलमूर्ती मंडळ ,शिवनेरी मंडळ,अष्टविनायक मंडळ, जय महाराष्ट्र मंडळ,डीएसएम मंडळ तसेच ग्रामपंचायातीचे सहकार्य लाभले आहे. स्पर्धेत सभभागी होण्यासाठी 9322811907, 9834635492, 7066500892, आणि 8888342740 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा