मिनाज जमादार यांनी लाखो रुपयांची विकासगंगा जनतेपर्यंत पोहोचविली : गणपतराव पाटील
हेरवाडमध्ये ७० लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
महिला काँग्रेस बळकट करण्याबरोबरच दत्तवाड पंचायत समिती मतदार संघाचा विकास साधण्यासाठी पंचायत समिती सदस्या मिनाज जमादार यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या माध्यमातून लाखो रुपयांची विकासगंगा जनतेपर्यंत पोहचली आहे. त्यामुळे मिनाज जमादार यांचे राजकीय आणि सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे. असे प्रतिपादन दत्त कारखान्याचे चेअरमन उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी केले.
हेरवाड येथे पंचायत समिती सदस्या मिनाज जमादार व दिलीप पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या सुमारे ७० लाख रुपयांच्या विविध विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी रावसाहेब कारदगे ते देवल सौदे पाणंद रस्ता मुरमीकरण, सुखदेव पोवार घर ते दिनकर माळी घर भूमिगत गटर्स बांधकाम, कन्या शाळेजवळील घोसरवाडकडे जाणाऱ्या रस्त्यालगत महिलांसाठी सार्वजनिक शौचालय बांधकाम, मा. नामदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या फंडातून आरोग्य उपकेंद्र हेरवाड दुरुस्ती करणे, सुतार ओढ्यानजीक असणारी भूमिगत गटर्स बांधकाम, लिंगायत समाज दफनभूमीमध्ये स्मशान शेड बांधकाम, मा.नामदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या फंडातून मुस्लिम समाज दफनभूमीमध्ये स्मशान शेड बांधकाम, कुमार विद्या मंदिर हेरवाड संरक्षक भिंत बांधकाम आणि गेट बसविणे, मा.नामदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या फंडातून नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास करणे अंतर्गत सिध्दार्थ नगर (माळभाग) येथे रस्ता करणे, नामदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या फंडातून पुनर्वसन वसाहत हेरवाड येथे अंगणवाडी क्र. ३९५ नविन इमारत बांधकाम, बिरदेव चौक माळभाग येथे हायमास्ट दिवा बसविणे, नामदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या फंडातून संतुबाई माळ हेरवाड येथे अंगणवाडी क्रमांक २८६ नविन इमारत बांधकाम, जमादार मळा ते उगारे मळ्याकडे जाणारा रस्ता नामदार हसनसो मुश्रीफ यांच्या २५१५ फंडातून खडीकरण व डांबरीकरण करणे, संतुबाई मंदिर ते टाकळीवाडी रस्ता यासह विविध विकास कामांचा शुभारंभ गणपतराव पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी दत्तचे संचालक शेखर पाटील, दरगु गावडे, पंचायत समिती सदस्या मिनाज जमादार, ग्रामविकास अधिकारी पी. आर. कोळेकर, सरपंच सुरगोंडा पाटील, ग्रा .पं. सदस्य सुकूमार पाटील, दिलीप पाटील, हेरवाड विकास सोसायटीचे चेअरमन वैभव पाटील, युनूसअली जमादार, जमीर मुल्ला, हयातचांद जमादार, अर्जुन जाधव, काकासो शिंदे, राहूल देसाई, दगडू कोरुचे, संजय पुजारी, प्रताप देसाई, तंटामुक्त अध्यक्ष बाबुराव माळी, इमाम जमादार, रघुनाथ पुजारी, प्यारेलाल मुल्ला, अजित अकिवाटे, आपगोंडा पाटील, अब्दुल जमादार, नरसगोंडा पाटील, रंजेश कडते, साताप्पा कोरूचे, सतिश मगदुम, शब्बीर जमादार, कुमार देसाई, दस्तगीर जमादार, रफिक जमादार यांच्या सह अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा