श्री राजश्री शाहू आघाडी ची विजयी संकल्प रॅलीने प्रचाराची सांगता

 


राहूल डोंगरे / शिवार न्यूज नेटवर्क :

श्री हनुमान विकास सेवा सोसायटी च्या निवडणुकीत सत्ताधारी श्री राजश्री शाहू आघाडी कडून शेकडो सभासद वर्गाच्या उपस्थितीत जोरदार शक्ती प्रदर्शन करीत विजयी संकल्प प्रचार रॅली ने सांगता करण्यात आली.

     श्री हनुमान विकास सेवा सोसायटी निवडणुकीसाठी गेल्या कित्येक दिवसा पासून धडधडत असलेल्या राजकीय तोफा गुरुवारी सायंकाळी पाच वाजता थंड झाल्या. यावेळी श्री राजश्री शाहू आघाडीचे प्रमुख नंदकुमार पाटील आणि प्रदीप चौगुले सावकर यांनी विरोधकांच्या सर्व जोरदार प्रत्यूत्तर दिले.   विरोधकांचे सर्व आरोप फेटाळून लावले आणि सुज्ञ सभासद वर्ग आमच्या मागे खंबीर पणे उभा आहे. आणि त्याच्या आशीर्वादाने आम्ही भरगोस मतांनी आमच्या आघाडी तील सर्व उमेदवार विजयी होणार. 23 एप्रिल रोजी मतदान होत आहे. एकूण 12 जागेसाठी होणाऱ्या निवडणुकीत सत्ताधारी गटाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष