श्री हनुमान सेवा सोसायटीमध्ये सत्ताधारी गटाची एकहाती सत्ता



 राहूल डोंगरे / शिवार न्यूज नेटवर्क :

जिल्ह्याचे लक्ष लागुन राहिलेल्या अर्जुनवाड येथील श्री हनुमान विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्था मर्यादित अर्जुनवाडच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी राजर्षी शाहु विकास आघाडीने विरोधी अर्जुनेश्वर परिवर्तन पॅनेलचा धुव्वा उडवत सर्वच्या सर्व जागा जिंकुन गड कायम राखला.

यामध्ये विजयी उमेदवार असे - दिलीप रावसो कळंत्रे, प्रदीप बाळासो चौगुले, शरद धनपाल चौगुले, नंदकुमार बापुसो पाटील, प्रामोद वसंतराव पाटील, शिवगोंडा आणासो पाटील, संजय गणपती महाडीक, विशाल विजय सुर्यवंशी, अनिता अकाराम दुधाळे, विदयाराणी धनंजय मोरे, किसन बाळु कांबळे, गजानन महादेव करे हे बारा जण मोठ्या मताधिक्याने निवडुन आले आहेत. तर यापुर्वीच या आघाडीचे चंद्रकान्त मारूती गंगधर हे बिनविरोध निवडुन आले आहेत.

दुरंगी व अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीची चर्चा गेली महिनाभर सर्वत्र चालु होती अनेकांनी पैजा लावल्या होत्या. विरोधी पॅनेलला एकाही जागा मिळवता आली नाही. विजयी राजर्षी शाहु विकास आघाडीच्या उमेदवार व समर्थकांनी गुलालाची उधळण करत फटाके उडवत जल्लोष साजरा केला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष