नॅशनल गेम्स वेटलिफ्टिंग स्पर्धेत तेजस जोंधळेला सुवर्णपदक
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
बेंगळूरू येथे सुरु असलेल्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी नॅशनल गेम्स वेटलिफ्टिंग स्पर्धेत हेरवाड गावचे सुपूत्र तेजस जोंधळे याने सुवर्णपदक प्राप्त करून हेरवाड गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
सदरच्या वेटलिफ्टिंग स्पर्धा या बेंगळूरू येथे सुरु आहेत. या स्पर्धेसाठी देशभरातून अनेक स्पर्धेक दाखल झाले आहेत. तेजस याने गेल्या काही आठवड्यांपूर्वी ओरिसा- भुवनेश्वर येथे झालेल्या स्पर्धेत १२४ किलो स्नॅच व क्लीन आणि जर्क मध्ये १४४ किलो वजन उचलून राष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक प्राप्त केले होते. तेजस याला प्रशिक्षक प्रदिप पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
तेजस याने या अगोदर वेटलिफ्टिंग स्पर्धेत भरगोस यश मिळविले आहे. आजपर्यंत त्याने राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्पर्धेत आपली चमकदार कामगिरी बजावली आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा