३० एप्रिलपासून कुरुंदवाडमध्ये रंगणार कबड्डीचा थरार



 कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

    महाराष्ट्र राज्य व कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने येथील तबक उद्यान येथे विद्युत झोतात माजी नगराध्यक्ष कै.गणपतराव पोमजे(मामा) क्रीडानगरीत पुरुष खुला गट व 55 किलो कबड्डी स्पर्धा आणि कराटे स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धा 30 एप्रिल ते 3मे पर्यंत संपन्न होणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष वैभव उगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

       माहिती देताना माजी नगराध्यक्ष उगळे पुढे म्हणाले तबक उद्यान येथे माजी नगराध्यक्ष स्व. गणपतराव पोमाजे क्रीडानगरीत कबड्डी क्षेत्रातील नामवंत खेळाडूंच्या नावे 4 क्रीडांगण तयार करण्यात येणार आहेत.

           कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील नामवंत 20 निमंत्रित संघात पुरुष खुल्या गटाच्या स्पर्धा साखळी पद्धतीने खेळवण्यात येणार आहेत.विजेत्यांना संघांना खालीलप्रमाणे अनुक्रमे प्रथम क्रमांक रोख 31 हजार,द्वितीय क्रमांक रोख 21 हजार,तृतीय क्रमांक 11 हजार व सर्व विजेत्या संघांना कायम चषक प्रदान करण्यात येणार आहे.

       55 किलो गटातील स्पर्धा 30 ते 35 निमंत्रित संघात बाद पद्धतीने खेळवल्या जाणार आहेत.विजेत्या संघाना अनुक्रमे बक्षीस प्रथम क्रमांक रोख 15 हजार, व्दितीय क्रमांक रोख 11 हजार,तृतीय क्रमांक रोख 7 हजार रुपये व सर्व विजेत्या संघांना कायम चषक देण्यात येणार आहे.

 खुल्या व 55 किलो वजनी गटातील स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडू, उत्तम चढाई,पकड आणि विशेष चमकदार खेळ करणाऱ्यांना वैयक्तिक बक्षिसे देण्यात येणार आहेत.30 एप्रिल रोजी सायं.4 वाजता स्पर्धेला प्रारंभ होणार आहे.तर 3मे रोजी अंतिम सामने व बक्षिस  समारंभ होणार असल्याचे माजी नगराध्यक्ष उगळे यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस यावेळी आब्बास पाथरवट, के.एस.दानवाडे, वैभव उगळे, सुरेश देसाई, नामदेव कमलाकर, गणेश तावदारे, सुहास पुजारी, रणजित कोळेकर, शितल पाटील, मिरासाब पाथरवट, महावीर पट्टेकरी, महावीर कोप्पे, श्रीकांत चव्हाण यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष