कुमार वि मं दानोळी नं २ शाळा गुणवत्तेत अव्वल
राहूल डोंगरे / शिवार न्यूज नेटवर्क :
दानोळी येथील कुमार वि मं दानोळी नं 2 या शाळेत महात्मा फुले जयंती साजरी करण्यात आली यावेळी फोटो पूजन सरपंच सौ सुनिता वाळकुंजे, उपसरपंच विपूल भिलवडे, ग्रामपंचायत सदस्य प्रविण उर्फ दादा खोत, श्रावण कांबळे, रोहित धनवडे, पिंटू गावडे सौ शोभा गावडे, सौ पल्लवी केकले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अभय वाळकुंजे यांचे शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी सरपंच सौ सुनिता वाळकुंजे यांना आदर्श सरपंच पुरस्कार मिळालेबद्दल व नूतन उपसरपंच पदी श्री विपूल भिलवडे यांची निवड झालेबद्दल शाळेमार्फत व व्यवस्थापन समिती मार्फत सत्कार करण्यात आला.
यावेळी सर्व विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समिती सदस्य मुख्याध्यापक श्री अरविंद मजलेकर सर व स्टाफ उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा