चिंचवाड हनुमान सोसायटीच्या अध्यक्षपदी आण्णासो ककडे
राहूल डोंगरे / शिवार न्यूज नेटवर्क :
चिंचवाड, ता. शिरोळ येथील आमाण्णा ककडे जय हनुमान विकास सेवा सोसायटीची निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. या सोसायटीच्या अध्यक्षपदी आण्णासो ककडे तर उपाध्यक्षपदी सुदर्शन चौगुले यांची निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रेमचंद राठोड यांनी काम पाहिले. यावेळी संचालक विशाल चौगुले, बाबू चौगुले, मनोहर काळे, आण्णासो शिरगावे, तुकाराम पाटोळे, केशव नाईक, शंकर माने, रेखा चौगुले, बेबी चौगुले, स्वप्नील पाटील यांच्यासह माजी प.स. सभापती सुदर्शन ककडे, सुरगोंडा पाटील, धाडस चौगुले, सचिव राजू थोरवत, क्लार्क भरत जाधव उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा