दत्तवाड येथे खासदार शेट्टी स्वाभिमानी शेतकरी विकास आघाडीची बाजी
इसाक नदाफ / शिवार न्यूज नेटवर्क :
कोल्हापूर जिल्हा आणि शिरोळ तालुक्याचे लक्ष वेधून राहिलेल्या दत्तवाड (ता.शिरोळ) येथील स्वाभिमानी शेतकरी विकास सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी खासदार शेट्टी यांच्या दोन्ही गटांपैकी खासदार राजू शेट्टी स्वाभिमानी शेतकरी विकास आघाडीने विरोधात असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटना पॅनेलवर ११ विरुद्ध ० असा दणदणीत एकतर्फी विजय मिळवून आणि धुव्वा उडवून दारुण पराभव केला. प्रथमच दत्तवाड च्या इतिहासात जनतेचा कौल नवनिर्वाचित युवा सदस्यांकडे दिसून आला.
विजयी गटाचे प्रमुख श्री. प्रकाश सुरचंद्र सिदनाळे यांचे विशेष बहुमोल मार्गदर्शन मोलाचे ठरले तर उलट पराभूत जुन्या गटाचे नेते श्री.आदिनाथ बाळू हेमगिरे व श्री. नाना नेजे या दोघांचे मार्गदर्शन कमी पडले आणि युवानेते प्रकाशआण्णा श्रेष्ठ ठरले. रविवार दि. ३ एप्रिल रोजी संध्याकाळी निकाल लागताच विजयी युवा गटांनी गांधी चौकातून फटाके फोडत गुलाल उधळत उशिरापर्यंत गावातून मिरवणूक काढली व आपल्या विजयाचा आनंद उत्सव साजरा केला.
आघाडीचे विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते सामान्य प्रतिनिधी- प्रकाश सिदनाळे (२०१),अजित चौगुले(१९१), श्रेणिक धुपदाळे(१८७), अनिल गळतगे(१८५), शितल सूर्यवंशी(१८३), नरसगोंडा पाटील(१७७), रावसो धोतरे(१७२), प्रकाश हेमगिरे(१६६) ओबीसी प्रतिनिधी- शामराव सुतार(१८७) महिला प्रतिनिधी- शानाबाई खडकोळे(१७५), वैशाली पाटील(१६८) या सर्व उमेदवाराचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा