बांबरवाडी,दत्तवाड शाळेत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती संपन्न
दत्तवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
बांबरवाडी, दत्तवाड येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करणेत आली.
प्रारंभी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री.नामदेव चव्हाण यांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन करणेत आले. विद्यार्थ्यांची वक्तृत्व स्पर्धा,एकपात्रीअभिनय(वेषभूषासह) स्पर्धा,चित्रकला स्पर्धा संपन्न झाली.अध्यापिका सौ. सरिता राजमाने यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला. सूत्रसंचलन व आभार मुख्याध्यापक दिलीप शिरढोणे सरांनी केले.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा