शिरोळमधून नाईकबा यात्रेला भाविक रवाना
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
सातारा जिल्ह्यातील श्री नाईकबा- ढेबेवाडी येथे मंगळवारी 5 एप्रिल ते गुरुवारी 7 एप्रिल अखेर श्री नाईकबा देवाची यात्रा होत आहे, आज मंगळवारी दुपारी शिरोळ व परिसरातील भक्तगण श्री नाईकबा यात्रेला रवाना झाले, दरम्यान, एसटी बस, ट्रक ,ट्रॅक्टर यासह अन्य वाहनातून सवाद्य नाईकबा डोंगरावर दाखल होत आहेत. गेल्या दोन वर्षात कोरोना महामारीच्या संकटकाळा नंतर यावर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नाईकबा देवाची सासनकाठी स्थापन करण्यात आल्या तसेच प्रशासनाने नियम शिथिल केल्याने कुलस्वामी श्री नाईकबा यात्रेला जाण्यासाठी भाविक उत्सुक झाले होते, श्री नाईकबा भेटीच्या भक्तीचा पर्वणी आनंद मिळाल्याने भाविकातून समाधान व्यक्त होत आहे.
दरम्यान, येथील श्री संत रोहिदास नगर मधील श्री नाईकबा देवस्थानचे गजानन माने व नंदकुमार माने यांच्यासह भाविकांच्या उपस्थितीत मंगळवारी नाईकबा देवाची पूजा-अर्चा कार्यक्रम झाला, त्यानंतर नाईकबा च्या नावानं चांगभलं असा जयघोष करीत भाविक नाईकबा यात्रेला रवाना झाले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा