हेरवाड येथील मातंग समाज मंदिरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान महावीर जयंती साजरी
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
हेरवाड येथील मातंग समाज मंदिरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान महावीर यांची जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान महावीर यांच्या प्रतिमेचे पुजन करुन पुष्यहार अर्पण करण्यात आले. यावेळी बाळासाहेब गायकवाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान महावीर यांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला.
यावेळी कुमार गायकवाड, बबन गायकवाड, तानाजी गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, सागर आवळे, दयानंद गायकवाड, आप्पा आवळे, किशोर गायकवाड, विकास गायकवाड, सचिन गायकवाड, सुरज आवळे, सुनिल गायकवाड यांच्यासह मातंग समाजातील पदाधिकारी उपस्थित होते.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा