१ मे च्या पूर परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित राहा : बंडू बरगाले



हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

महापूर ही निसर्गनिर्मित आपत्ती नसून ती आता मानवनिर्मित आपत्ती झाली आहे. महापूर का येतो, कशामुळे येतो, कुणामुळे येतो याचा सारासार अभ्यास सर्वसामान्यांना कळणे गरजेचे आहे. त्यामुळे येणार्‍या महापुरावर मात करण्यासाठी १ मे रोजी होणार्‍या पूर परिषदेस सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन हेरवाड येथील सामाजिक कार्यकर्ते बंडू बरगाले यांनी केले. 

१ मे रोजी होणार्‍या पुर परिषदेच्या पार्श्वभूमिवर पुरमुक्ती जनसंवाद यात्रा हेरवाड येथे दाखल झाली. यावेळी ते बोलत होते. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक आंदोलन अंकुशचे दीपक बंडगर यांनी केले. 

यावेळी आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे म्हणाले, राज्य सरकार ने महापूराची कारणे शोधणाऱ्या समित्यांनी या भागातील वारंवार येणाऱ्या महापुरास अलमट्टी धरणास थेटपणे जबाबदार ठरवले नसले तरी 2005 नंतरच महापूर का येतो आहे याचे उत्तर ते देत नाहीत. 2005 च्या मुबंई मधील महापुरावर उपाय शोधून त्याप्रमाणे पाऊले उचलली गेली म्हणून त्यानंतर मुबंई मध्ये पुन्हा पूर आला नाही. मुबंई प्रमाणे या भागातील महापुराची कारणे शोधून उपाय योजना केल्यास आपल्या भागातील पूर रोखता येतो. 

  तज्ञांनी स्वतंत्र पणे तसे प्रस्ताव शासनाला दिले आहेत पण शासन त्याबद्दल गंभीर नाही. शासनाने उपाय शोधून महापुरापासून या भागाची कायमस्वरूपी मुक्तता करावी यासाठी 1 मे ची पूर परिषद घेत आहोत. 

लोकांनी या पूर परिषदेस मोठया प्रमाणात उपस्थिती लावल्यास शासन आणि लोकप्रतिनिधी जागे होतील आणि त्यातूनच शिरोळ तालुक्याला पूरमुक्ती मिळेल, त्यासाठी ताकतीने पूर परिषदेस येण्याचे त्यांनी आवाहन केले.

यावेळी तालुकाध्यक्ष दीपक पाटील, गावडे सर यांची भाषणे झाली.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य देवगोंडा आलासे, मा. तंटामुक्त समितीचे अध्यक्ष गिरीष पाटील, सामाजिक कार्यकर्ते अजित अकिवाटे, तेरवाडचे ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर बंडगर, सरदार जमादार, राकेश जगदाळे, भूषण गंगावणे, भोसले सर, पोपट माळी, योगेश जाधव यांच्यासह गावातील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष