अतिग्रेत राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे १६ रोजी अधिवेशन

 


अतिग्रे / शिवार न्यूज नेटवर्क :

 अतिग्रे येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ उपशाखा हातकणंगले यांचे त्रैवार्षिक अधिवेशन व शिक्षक मेळावा शनिवार १६ रोजी दुपारी १ वाजता साईराज मंगल कार्यालय येथे होत आहे. उद्घाटन खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी आमदार राजूबाबा आवळे असणार आहेत. शिक्षक संघाचे नेते, संभाजीराव थोरात व अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.. अधिवेशनात राज्य संपर्कप्रमुख एस. व्ही. पाटील, राज्य उपाध्यक्ष आनंदराव जाधव, बाळासो निंबाळकर, जिल्हा शिक्षक नेते रघुनाथ खोत, जिल्हा अध्यक्ष रवी कुमार पाटील, ए. के. पाटील, मधुकर नेसणे, दिनकर पाटील, जीवन मिठारी, सुरेश कांबळे, रावसाहेब देसाई, सुनील एडके, सरचिटणीस सुनील पाटील, कोषाध्यक्ष अरुण चाळके, गणेश खामकर, कार्याध्यक्ष बाळकृष्ण हळदणकर, जिल्हा अध्यक्ष जयवंत पाटील व महिला आघाडी प्रमुख लक्ष्मी पाटील, संघटक अलका खोत, तालुकाध्यक्ष, सरचिटणीस उपस्थित राहणार आहेत. तरी मेळाव्यास शिक्षकांनी मोठ्या संख्येने यावे, असे आवाहन केले आहे..

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष