विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त साऊंड सिस्टीम लावन्यास परवानगी द्या- सतिश माळगे

 


इसाक नदाफ / शिवार न्यूज नेटवर्क :

येत्या १४ एप्रिल रोजी महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती येत आहे मागील दोन वर्षे कोरोनमुळे जयंती साजरी करता आलेली नाही, परंतु आपल्या राज्याचे मुख्यमंत्री मा: उद्धवजी ठाकरे साहेब यांनी सदर येणारी जयंती मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरी करण्याबाबत कॅबिनेट मिटिंग मध्ये जाहीर केले आहे. तसेच सदर जयंती संपूर्ण जगात साजरी होत आहे. या जयंती दिवशी मा:सर्वोच्च न्यायालय यांच्या आदेशाचे पालन करून आम्हास साऊंड सिस्टिम लावण्यास परवानगी देण्यात यावी, सदर साऊंड सिस्टिमचा वापर आम्ही मा:सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे करू तसेच सदर साऊंड सिस्टिम चा कोणासही त्रास होणार नाही व त्याचे डीसीबल अत्यंत कमी प्रमाणात ठेवून आम्ही विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती मोठ्या थाटामाटात करू इच्छितो म्हणून आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने आम्ही आपणास साऊंड सिस्टिम ची परवानगी मिळण्याबाबत विनंती करत आहोत. अशा मागणीचे निवेदन रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जिल्हा नेते सतिश माळगे (दादा) यांच्या नेतृत्वाखाली मा.सहा. पोलीस निरीक्षकसो, कुरूंदवाड पोलीस स्टेशन यांना देण्यात आले.

यावेळी अलोक अरुण कडाळे, रंजित कांबळे, अनिल कांबळे,श्रीधर कांबळे, संजय कांबळे हे उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष