पूर परिषदेच्या माध्यमातून सरकारला धडक देण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हा : महिपती बाबर
कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
शिरोळ तालुका हा कर्नाटक राज्याच्या सीमेवर आहे.त्यामुळे सर्वात प्रथम कुरुंदवाड शहराला महापुराचा फटका बसतो. कृष्णा नदीत निर्माण झालेले अडथळे आणि शासनाच्या अडमुठे धोरणामुळेच पुराचा फटका बसत आहे.महापुरावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी1मे रोजी होणाऱ्या पूर परिषदेच्या माध्यमातून सरकारला धडक देण्यासाठी परिषदेत मोठ्या संख्येने सहभागी व्हा असे आवाहन मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष महिपती बाबर यांनी केले.
कुरुंदवाड कृष्णा घाट येथे 1 मे रोजी होणाऱ्या पूर परिषदेच्या पार्श्वभूमीवर आयोजित पुरमुक्ती जनसंवाद यात्रेत जिल्हाध्यक्ष बाबर बोलत होते.आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे,नगरसेवक उदय डांगे, चंद्रकांत जोंग आदी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना चुडमुंगे म्हणाले 2005 सालापासून सांगली- कोल्हापूर जिल्ह्याला आजपर्यंत अनेक महापुराचा सामना करावा लागला आहे.शेती व आर्थिक संपत्ती बरोबरच मानसिक संपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.राज्य सरकारने कर्नाटक सरकारशी समनवय साधून महापुरावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सरकारला भाग पाडण्यासाठी पूर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
महापुरातून मुक्ती मिळवण्यासाठी आपली वज्र्य मूठ बांधणे गरजेचे आहे.
यावेळी बोलताना जोंग म्हणाले कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकारमध्ये समनवय नसल्याने आजपर्यंत निर्माण झालेल्या महाप्रलयकारी पुरामुळे शेती उद्धवस्त झाली,अनेक जनावरे दगावली,यंत्रमाग व्यवसाय तळागाळात गेला या पुरामुळे शिरोळ तालुका 20 वर्षे पाठीमागे गेला आहे.सरकारने ही तुटपुंजी मदत देण्यापलीकडे काहीच केलं नाही.महापुरावर तोडगा काढण्यात सरकार अपयशी ठरले आहे.त्यामुळे आमची अडचण आम्हालाच सोडवावी लागणार असल्याने पुरग्रस्तानी पेटून उठण्याची गरज असल्याचे सांगितले.
यावेळी रशीद मुल्ला, सुदाम सकट, भीमराव यादव, राकेश जगदाळे, आण्णासो वडगावे,कुदरत भुसारी, अकील गोलंदाज, भीमराव यादव, हारूण म्हतापे आदी उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा