हेरवाड येथे विविध ठिकाणी डॉ. आंबेडकर व महावीर जयंती साजरी

 


हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

हेरवाड येथील मातंग समाज मंदिर, ग्रामपंचायत, गांवभाग व माळ भागातील समाज मंदिर, जैन बस्ती यासह विविध ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान महावीर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. 

दरम्यान सकाळी समस्त बौद्ध समाज व जैन बांधवांच्या वतीने गावातून मिरवणूक काढण्यात आली. यानंतर येथील येथील मातंग समाज मंदिर, ग्रामपंचायत, गांवभाग व माळ भागातील समाज मंदिर, जैन बस्ती यासह विविध ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान महावीर यांची जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. 

यावेळी विविध ठिकाणी झालेल्या जयंतीप्रसंगी सुशांत पाटील, सरपंच सुरगोंडा पाटील, उपसरपंच विकास माळी, अँड अनिरुध्द कांबळे, ग्रामविकास अधिकारी पी. आर. कोळेकर सर्व ग्रामपंचायत सदस्य, गावातील पदधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, बौद्ध समाज बांधव, जैन समाज बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष