महिला मेळाव्याला प्राथमिक शिक्षिकांचा मोठा प्रतिसाद

 


जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :

 महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ उपशाखा शिरोळ वतीने प्राथमिक शिक्षक बँक कोल्हापूर चेअरमनपदी स्मिता डिग्रजे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार व महिला मेळावा आयोजित केला होता. यावेळी शिरोळ तालुक्यातील प्राथमिक शिक्षिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सभापती दिपाली परीट होत्या. प्रारंभी उपस्थिताचे स्वागत निलिमा रजपूत संचालिका खर्डेकर पतसंस्था यांनी केले. उषा उत्तम सुतार यांच्या प्रास्ताविक मध्ये संघटनेच्या व राजाराम वरुटे सरांसारख्या नेतृत्वामुळेच आम्ही शिक्षिका शाळेतील विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य मनापासून करत असतो. त्यामुळे महिलांनीही संघटनांना मोठ्या प्रमाणात पाठबळ देणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले.

श्री संभाजी बापट म्हणाले, स्मिता डिग्रजे आज शिक्षक बँकेच्या चेअरमन म्हणून जिल्ह्यातील सर्व महिलांचं प्रतिनिधित्व अतिशय सक्षमपणे व प्रभावीपणे करत आहेत. अशा महिला नेतृत्वाला आपण सर्वांनी साथ देऊया असे मत व्यक्त केले. राजाराम वरुटे यांनी आपल्या मनोगतात सर्व महिला या जबाबदारी स्वीकारून आदर्शवत काम करत असतात अशा सर्व महिलाचे कार्य कौतुकास्पद आहे. संघटनेच्या कामातही महिलांचा सक्रिय सहभाग वाढावा, असे सुचविले. नुतन चेअरमन स्मिता डिग्रजे यांनी महिलांसाठी शिक्षक बँकेत ठेवीवरील व्याजदर 0.25% जादा व कर्जाचा व्याजदर सर्वांनासाठी 10%करुन एक ऐतिहासिक निर्णय संचालक मंडळाला घेण्यास भाग पाडले, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

यावेळी रत्नप्रभा दबडे,भारती कोळी, शिक्षण विस्तार अधिकारी, मनिषा पाळवदे,राजु जुगळे, लेखिका निलम माणगावे, दामोदर सुतार यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले.

यावेळी शिरोळच्या तहसीलदार अपर्णा मोरे यांच्या हस्ते डिग्रजे यांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

दुपारच्या सत्रात सहभागी महिलांची आरोग्य तपासणी तसेच विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम घेण्यात आले सदर कार्यक्रमास महिलांनी उत्स्पूर्त पणे सहभाग नोदवला.

या कार्यक्रमामध्ये आपल्या सुमधुर गायनाने प्रकाश रत्नाकर व संपुर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्टपणे

निवेदन सुरेखा कुंभार यांनी केल्यामुळे कार्यक्रमाची उंची वाढवली.

या मेळाव्यामध्ये तालुक्यातील विविध सेवाभावी संस्थेकडून आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त महिला शिक्षकांचे सन्मान करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी बँकेचे व्हाईस चेअरमन बजरंग लगारे व बँक संचालक मंडळ, जिल्हा सरचिटणीस उत्तम सुतार ,शिक्षक संघ तालुकाध्यक्ष व त्यांची कार्यकारणी , नगरसेविका प्रमिला मुरगुंडे, विजयकुमार पाटील, खर्डेकर पतसंस्थेचे चेअरमन सुभाष शहापुरे, संभाजी कदम, राजेंद्र यळगुडे, बसवराज वाले, सानेगुरुजी पतसंस्थेचे चेअरमन अरविंद मजलेकर, नाविद पटेल, उदय गायकवाड, माया मडिवाळ, रईस पटेल, उर्दु शिक्षक भारती, मनोज रणदिवे, मदन कांबळे, राजाराम सुतार, अनिल खिलारे, मसापा नंदीवाले यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.पहिल्या सत्राचे आभार संचालक दिलीप पाटील यांनी मानले.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष