ग्रामस्थांच्या थकित करामुळे ग्रामपंचायत अडचणीत
राहूल डोंगरे / शिवार न्यूज नेटवर्क :
अर्जुनवाड ता शिरोळ येथील ग्रामपंचायतीत गावातील घर पट्टीआणि पाणी पट्टी वेळेत भरत नसल्याने ग्रामपंचायतिला अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे ग्रामपंचायत वीजबिल थकीत असल्याने गावात पाणीपुरवठा करणाऱ्या वीज कनेक्शन कट करण्याची वेळ आली होती त्यामुळे गावात पाणीटंचाई निर्माण झाली होती व वेळेत घर पट्टी आणि पाणी पट्टी नसल्याने ग्रामपंचायत च्या कामगाराचे पगार देताना ग्रामपंचायत तिला तारे वरची कसरत करावी लागत आहे या सर्व गोष्टी ला वेळेत नं भरणारे खातेदार असून याला जबाबदार आहेत आपली पाणीपट्टी वेळेत भरण्याकडे सपशेल पाठ फिरवली असल्याने त्याचा परिणाम वीज बिल थकबाकी वाढत चालले आहे.
गावात सुमारे 1200च्या आसपास नळ कनेक्शन असून, नळ धारकांकडून पाणीपट्टी प्रति वर्षी 1500 इतकी आकारणी केली जाते. पण ही पाणीपट्टी नियमित भरणाऱ्यांची संख्या फक्त 35 %टक्के इतकीच आहे तर बाकीचे नळ धारक पाणीपट्टी भरण्याच्या आपल्या जबाबदरीकडे पाठ फिरवीत आहेत. परिणामी थकबाकीची रक्कम देखील वाढत आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा