"पुरोगामी शिक्षक परिवाराकडून कन्या व कुमार घोसरवाडच्या निराधार मुलामुलींना पुरोगामी संघटना पालकत्व अंतर्गत शैक्षणिक किटचे वाटप "
घोसरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
घोसरवाड येथील कुमार व कन्या विद्या मंदिर येथील निराधार मुला-मुलींना शैक्षणिक कीटचे वाटप पुरोगामी शिक्षक परिवारांकडून करणेत आले.
राज्याध्यक्ष -श्री.प्रसाद पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही योजना जिल्हाभर सुरू आहे. आतापर्यंत जवळपास 1500 निराधार विद्यार्थ्यांना शैक्षणिक पालकत्व घेऊन त्यांना लाभ दिला आहे. त्याच अनुषंगाने आज घोसरवाड येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुलामुलींना शैक्षणिक कीटचे वाटप केंद्रप्रमुख -श्री.रमेश शंकर कोळी यांच्या शुभहस्ते करणेत आले.
याप्रसंगी कुमार घोसरवाड शाळेचे व्य. समिती अध्यक्ष श्री रामचंद्र नंदिकुरळे, सदस्य श्री वैशाली कुलकर्णी, श्री प्रवीण नंदिकुरळे, श्री सतिश चव्हाण, पुरोगामी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष श्री.दशरथ खोत,तालुका सरचिटणीस -श्री.शरद अवघडी, संघटक श्री.अनिल मंगावे,श्री.दिलीप शिरढोणे,श्री. गुंडा परीट,श्री. गांधी कांबळे, श्री.रमेश मारूती कोळी,श्री.विद्याधर मोकाशी,श्री.संजय निकम,श्री.शामराव कांबळे, सौ.प्रतिभा निर्मळे,सौ. ज्योती परीट,सौ.सविता बंडगर,श्री.विनायक कांबळे,श्री. नंदकुमार पोवार,श्री.दत्तात्रय कचरे उपस्थित होते.

खूप सुंदर 👌👌👌👌
उत्तर द्याहटवा