नृसिंहवाडी येथे १९ रोजी मोफत कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन

 


कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

स्वर्गीय सौ. मालती शामराव पाटील मेमोरियल ट्रस्ट व भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्ट यांच्या वतीने कॅन्सर रुग्णांसाठी मोफत तपासणी व सल्ला शिबिराचे आयोजन गुरुवार दि. १९ मे रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत शिरोळ - नृसिंहवाडी रोडलगत असलेल्या संजय सांस्कृतिक हॉल येथे होणार असल्याची माहिती डॉ. संजयदादा पाटील आणि अँड. सुशांत पाटील यांनी दिली.

या शिबिरात पुण्यातील प्रसिद्ध आयुर्वेदिक कॅन्सर तज्ञ डॉ. सदानंद सरदेशमुख व सहकारी तज्ञ डॉक्टर यांचे कडून कॅन्सर तपासणी, कॅन्सर रुग्णांना आयुर्वेदिक चिकित्सा सल्ला देण्यात येणार आहे. तरी या शिबिराचा लाभ शिरोळ तालुक्यातील रुग्णांनी घ्यावा असे आवाहन पाटील यांनी केले आहे. दरम्यान नांव नोंदणीसाठी डॉ. अभिषेक साळुंखे ( मो. 9768067094) कोल्हापूर केंद्र (99708484999), पुणे केंद्र (0230-67346000) या ठिकाणी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष