हेरवाडच्या स्मशान भुमिची डागडुजी करा : बंडू पाटील
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
महापुरात हेरवाड येथील स्मशानभूमीचे पत्रे महापुरात वाहून गेले आहेत. त्यामुळे गावातील मृतदेह दहन करण्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून याकडे तातडीने लक्ष देऊन स्मशानभूमीची डागडुजी करण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडी तालुकाध्यक्ष बंडू पाटील यांनी केली आहे.
महापुरात हेरवाड नदीकाठावर असलेल्या स्मशानभूमीचे पत्रे वाहून गेले. गेल्या वर्षभरापासून या स्मशानभूमीवर पत्रे नसल्याने पावसाळ्याच्या काळात मृतदेहांचे दहन करण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे. गुरुवारी गावातील एक व्यक्ती मयत झाली, दिवसभर मोठा पाऊस सुरू होता, त्यामुळे मृतदेह दहन करण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर लगत असलेल्या निवारा शेडमध्ये सदरच्या मृतदेहाचे दहन करण्यात आले. त्यामुळे सदर स्मशानभूमीची डागडुजी तातडीने करावी, अशी मागणी बंडू पाटील यांनी केली आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा