विधवा महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी कायम कटीबध्द
आमदार जयश्रीताई जाधव यांचे हेरवाड येथे प्रतिपादन
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
विधवा महिलेचं दुख मी जाणते, हेरवाड गावाने विधवा महिला प्रथा बंद करुन एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्य शासनानेही या निर्णयाची दखल घेवून परिपत्रक काढल्याने आता राज्यातील विधवा महिलांना सन्मानाने जगता येणार आहे. विधवा महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी कायम कटीबध्द असेन, असे प्रतिपादन कोल्हापूर उत्तरच्या आमदार जयश्रीताई जाधव यांनी केले.
हेरवाड गावाने विधवा प्रथा बंद करुन याची प्रत्यक्ष अंमलबजावणी केल्याबद्दल आयोजीत सत्कार समारंभ कार्यक्रमात कोल्हापूर उत्तरच्या आमदार जयश्रीताई जाधव बोलत होत्या. यावेळी इनरव्हील क्लबच्या वतीने आमदार जयश्रीताई जाधव यांच्या हस्ते गावातील विधवा महिलांचा शिल्ड देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सुवर्णा पाटील म्हणाल्या, हेरवाड गावाने विधवा महिला प्रथा बंद करुन महिलांचा सन्मान केला आहे. राज्य शासनानेही याची दखल घेवून परिपत्रक काढल्याने आता राज्यातील विधवा महिलांना न्याय मिळणार आहे. त्यामुळे हेरवाडने केलेले कार्य सुवर्ण अक्षरांनी लिहण्याजोगे असल्याचे सांगितले. यावेळी वैशाली तराळ यांनी विधवा महिलांना विधवा असं न संबोधता पुर्णांगिनी म्हणून संबोधण्यात यावं अशी संकल्पना मांडली.
यावेळी सरपंच सुरगोंडा पाटील व सर्व ग्रामपंचायत सदस्यांचा आमदार जयश्रीताई जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी इनरव्हील क्लबच्या सेक्रेटरी मनिषा चव्हाण, सदस्या वैशाली तराळ, सुषमा गजबर ,ज्योती तेंडुलकर, विद्या जाधव, सुनिता पाटील, तेजस्वीनी देसाई, रोटरीयन अरविंद तराळ व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा