हेरवाड पॅटर्न: मंगळूर गावाने घेतला विधवा प्रथा बंदचा निर्णय
सांगली/ शिवार न्यूज नेटवर्क :
हेरवाड गावाने विधवा महिलांचा प्रश्न उचलून धरून त्याचा ठराव करून विधवा प्रथेला मुठमाती देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आणि राज्य शासनाला याची दखल घ्यावी लागली, आता हेरवाड पाठोपाठ सांगली जिल्ह्यातील मंगरूळ (ता. खानापूर विटा.) या गावाने विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सध्या परिसरात गावाचे कौतुक केलं जात आहे.
ग्रामीण भागात विधवा महिलांना सन्मान मिळाला, पती मृत झाल्यानंतर त्यांची आभुषणे न काढता आहे तशीच ठेवावी आणि प्रत्येक शुभकार्यात या महिलांना मान मिळावा, या हेतूने सांगली जिल्ह्यातील मंगरूळ (ता. खानापूर विटा.) या गावाने विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याप्रसंगी माजी सभापती मा. आनंदराव काका पाटील, सरपंच अंजली कुंभार, उपसरपंच अभिजीत पाटील, ग्रामसेवक डी. एस. मोहीते, सुभाष नाना शिंदे, गुंडाराम जाधव, तानाजी थोरात, आण्णा शिंदे, नवनाथ बापू शिंदे, बाबुराव शिंदे, शिपाई जालिंदर वाघमारे व सर्व जेष्ठ मार्गदर्शक उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा