विधवा महिलांच्या सन्मानासाठी हेरवाड ग्रामपंचगयतीने उचलले पाऊल

 हेरवाडच्या ग्रामसभेत विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव संमत



संतोष तारळे / शिवार न्यूज नेटवर्क: 

महिलांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या अनिष्ट प्रथेवर म्हणजे पतीच्या निधनानंतर विधवा समजून तिची आभूषणे काढणे, कुंकू पुसणे यांसह अन्य प्रकारे छळ करण्याची प्रथा बंद करण्यासाठी हेरवाड ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला असून याबाबतचा ठराव हेरवाडच्या ग्रामसभेत संमत करण्यात आला आहे. विधवा महिलांच्या सन्मानासाठी हेरवाड ग्रामपंचायतीने उचलेले पाऊल हे खरोखर कौतुकास्पद आहे.

खरंतर विधवा महिलांच्या प्रश्नावर पूर्वी पासून अनेकांनी खूपच चांगले काम केले आहे. शाहू, फुले , आंबेडकर यांच्या कामाला तोडच नाही. डॉ नरेंद दाभोलकर व त्यांच्या टीममुळे अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अस्तित्वात आला. विधवा महिलांच्या पुणरविवाह, आरोग्य, आर्थिक, मुलांचे शिक्षण, अलीकडे कोरोना मुळे झालेल्या विधवा महिला यांचा प्रश्न दुर्लक्षीत राहिला आहे. पतीच्या निधनानंतर पत्नीच्या कपाळावरचा कुंकू यांसह, मंगळसूत्र तोडणे. बांगड्या फोडणे , पायातील जोडवी काढणे व काही ठिकाणी हे साहित्य पतीच्या अग्नीत टाकणे हा प्रकार तिच्या इच्छा विरोधी आहे. तसेच मरेपर्यंत तिला सर्व प्रकारच्या कार्यक्रमात सहभागी होता येत नाही. सतीची प्रथा बंद झाली त्या पध्दतीने ही विधवा प्रथा बंद करण्यासाठी कायदा व्हायला पाहिजे किंवा अस्तित्वात असलेल्या कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याची गरज आहे. या हजारो वर्षांपासून आलेल्या अनिष्ट प्रथेला कायमस्वरूपी नष्ट करण्यासाठी हा विधवा महिला सन्मान व संरक्षण कायदा अभियान प्रेम बहुुददेशीय संस्थेच्या माध्यमातून प्रमोद झिंजाडे हे काम करीत आहेत.

हेरवाड गावात ग्रामसभेत विधवा प्रथा बंद करण्याचा नुकताच संमत केला आहे. हा निर्णय महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतीला दिशादर्शक असून हे चळवळीचे लोण महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात पसरणार आहे. लवकरच शिरोळ तालुक्यातील सर्व सरपंचांची या विषयावर कार्यशाळा आयोजित करून संपूर्ण शिरोळ तालुका विधवा प्रथामुक्त करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

इतर ग्रामपंचायतींनी पुढकार घ्यावा

 विधवा महिलांनाही सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्यांना त्यांचे हक्क देण्यासाठी ही विधवा प्रथा बंद करण्याची गरज आहे. या अभियानासाठी हेरवाड ग्रामपंचायतीच्या वतीने ठराव संमत करण्यात आला असून शिरोळ तालुक्यातील इतर ग्रामपंचायतींनी ठराव करून या अभियानाला हातभार लावावा.

- सुरगोंडा पाटील, सरपंच, हेरवाड

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष