कॉलेज बसला ईर्टीगाची धडक ; विद्यार्थ्यांसह आठ जण जखमी
कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
अब्दुललाट येथे बरगाले ऊस रोपवाटिकेजवळ थांबलेल्या कॉलेज बसला समोरुन येणाऱ्या ईर्टिगा कारने जोरदार धडक दिल्याने बसमधील ४ विद्यार्थी व ईर्टीगामधील ४ प्रवासी असे आठ जण जखमी झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी ईर्टीगाचे चालक अनंतसिंग गणेशसिंग रजपूत याच्या विरोधात कुरुंदवाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अब्दुललाट येथील बरगाले ऊस रोप वाटिकेजवळ कॉलेज बस थांबली असता समोरुन आलेल्या इर्टीगाने या बसला जोरदार धडक दिल्याने स्वप्नील तेली, छाया तेली, ओवी तेली, संकेत तेली तर दिव्या पाटील, काजल बिंदगे, श्रेया आवटी, अर्पिता देवमोरे हे आठजण जखमी झाले आहेत. तसेच या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस नाईक नागरगोजे करीत आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा