हेरवाडमध्ये उद्या पशु रोगनिदान शिबिराचे आयोजन
माजी सभापती सौ.मिनाज युनुसअल्ली जमादार यांची माहिती
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
पंचायत समितीच्या माजी सभापती सौ.मिनाज युनुसअल्ली जमादार यांच्या पुढाकाराने आणि विशेष प्रयत्नातून हेरवाड गावामध्ये सोमवार दिनांक ३० रोजी राज्यस्तरीय पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी - २ सांस्कृतिक सभागृह हेरवाड येथे सकाळी आठ वाजलेपासून पशुपालकांच्या पशुसाठी भव्य सर्वरोगनिदान शिबीर, व्यंधत्व निवारण शिबीर, जंत निर्मूलन शिबीर आयोजित करण्यात आले असून या शिबिराचा लाभ सर्व पशुपालकांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
या शिबिरात औषधोपचार आणि औषधे मोफत दिली जाणार आहेत. या शिबीरासाठी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. वाय. ए.पठाण, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार आणि शिरोळ तालुक्यातील तज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार आहेत. तरी हेरवाड गावातील जास्तीत जास्त पशुपालक शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पंचायत समितीच्या माजी सभापती मिनाज जमादार यांनी केले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा